बृहन्मुंबई महापालिकेने स्वतःचे ट्विटर अकाऊंट बनवले आहे. मुंबईकरांना महापालिकेकडे कोणत्याही तक्रारी द्यायच्या असतील, सल्ले द्यायचे असतील, तर त्यांनी या ट्विटर अकाऊन्टशी संपर्क साधण्याचे आवाहन अक्षयने केले आहे. परंतु या ट्वीटनंतर नेटीझन्सनीन अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अक्षय कुमारकडे कॅनडा या देशाचे नागरिकत्व आहे. परंतु अक्षय सातत्याने देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनवत असतो. (या चित्रपटांमध्ये अक्षयचे भारतावर खूप प्रेम आहे, असे दाखवले जाते) परंतु अक्षयचे ट्रोलर्स अक्षयला नेहमीच त्याच्या नागरिकत्वावरुन ट्रोल करत असतात. मुंबई महापालिकेबाबतच्या ट्वीटनंतर लोकांनी पुन्हा एकदा अक्षयला लक्ष्य केले आहे.
कॅनेडियन नागरिकत्त्वावर अक्षय कुमारचं काय म्हणणं आहे? | एबीपी माझा
कॅनडाच्या नागरिकाने मुंबईकरांना अक्कल शिकवू नये, अशा आशयाच्या कमेंट्स लोकांनी त्याच्या ट्वीटवर केल्या आहेत. दरम्यान, नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन अक्षयने यापूर्वी अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. अक्षयने सांगितले होते की, मी जरी कॅनडा या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असले, तरी मी गेली अनेक वर्ष तिकडे गेलेलो नाही. मी भारतातच माझा कर (टॅक्स) जमा करतो.
आयएनएस सुमित्रावर कॅनडाचा नागरिक अक्षय कुमार कसा? काँग्रेसचा मोदींना सवाल | एबीपी माझा
अक्ष्य कुमारचे ट्वीट
अशा प्रकारचे ट्वीट्स करुन अक्षयला ट्रोल केले जात आहे