नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार सध्या 'नाम शबाना' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान अक्षयला एक अनोखा अनुभव आला. दिल्लीतील गार्गी कॉलेजमधील एका तरुणीने थेट अक्षयसोबतच स्वसंरक्षणाचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं.

अभिनेता अक्षय कुमार स्वत: कराटे चॅम्पियन आहे. अक्षय कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही आहे. शिवाय, त्याने सिनेमांमध्येही थरारक अॅक्शन सीन केलेलेही आपण पाहिले आहेत.

अक्षय कुमार आणि तापसी पन्नू दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये 'नाम शबाना' सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले होते.

अक्षय कुमारने प्रमोशनदरम्यान तरुणींना सेल्फ-डिफेन्सचे धडे दिले. यावेळी समोरच्या गर्दीतील तरुणीला स्टेजवर बोलावलं. त्यावेळी तरुणीने सेल्फ-डिफेन्सचं प्रात्याक्षिक करुन दाखवताना अक्षय कुमारची मदत घेतली. अक्षय कुमाराला धोबीपछाड देत तरुणीने सेल्फ-डिफेन्सचं प्रात्यक्षिक दाखवलं.

दरम्यान, अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला 'नाम शबाना' सिनेमा येत्या 31 मार्चला रिलीज होणार आहे. या सिनेमातही अक्षय कुमारच्या अॅक्शनचा थरार पाहायला मिळणार आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/846241776281141248