मुंबई : अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' येत्या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होणार आहे. यावेळी बॉक्स ऑफिसवर अक्षयची टक्कर दिग्दर्शक नीरज पांडेंशी होणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' सिनेमाही 26 जानेवारी रोजी रीलिज होणार आहे.
नीरज पांडेंनी अय्यारी सिनेमाचं 'बिहाईंड द सीन' फूटेज ट्विटरवर शेअर केलं आहे. अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
अय्यारी हा चित्रपट सैन्याचे एक अधिकारी आणि त्यांच्या शिष्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयी सैन्याच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून सिद्धार्थ मल्होत्रा शिष्याच्या भूमिकेत आहे.
https://twitter.com/neerajpofficial/status/931839809085165568
अक्षय-रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाची टक्कर 'अय्यारी'शी होणार होती. मात्र हा सिनेमा आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षयने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पॅडमॅन रीलिज करण्याचं ठरवलं आहे.
पॅडमॅन हा चित्रपट गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या अरुणाचलम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अक्षय यात मुख्य भूमिकेत असून सोनम कपूर आणि राधिका आपटे त्याच्यासोबत दिसणार आहेत.
यापूर्वी, नीरज पांडेच्या स्पेशल 26 मध्ये अक्षय मनोज बाजपेयींसोबत झळकला होता. तर ब्रदर्स सिनेमात अक्षय आणि सिद्धार्थ यांनी स्क्रीन शेअर केली होती.
प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2017 12:04 PM (IST)
अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -