अक्षय कुमारचा दिव्या खोसलासह नवा सिनेमा
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 05:46 PM (IST)
मुंबईः खिलाडी अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये अखंडपणे काम करणारा अभिनेता अशी ओळख आहे. एका वर्षात अक्षय कुमारचे चार ते पाच सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आगामी 'रुस्तम' सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर असताना अक्षय कुमारने दुसरा सिनेमा साईन केला असल्याची बातमी आहे. अक्षय कुमार सध्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमाची शुटिंग करत आहे. मात्र आता त्याने 'सनम रे' सिनेमाची दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारसोबत दुसरा सिनेमा साईन केला असल्याचं सांगितलं जात आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तीसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. अक्षय कुमार आणि दिव्या खोसला पहिल्यांदा 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या सिनेमात एकत्र दिसले होते.