मुंबई : "मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या," अशी उद्विग्न प्रतिक्रिया बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने दिली आहे.
अक्षय कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आलं.
मात्र यानंतर विविध चर्चाही होऊ लागली. प्रियदर्शन राष्ट्रीय पुरस्कारांचे परीक्षक असल्याने अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असं ट्वीट दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामीने केलं.
पुरस्काराच्या वादाबाबत अक्षय कुमारला विचारलं असता तो म्हणाला की, "मी मागील 25 वर्षांपासून पाहत आलोय की, जेव्हा कोणीही पुरस्कार जिंकतो, त्यावर चर्चा होते. कायम कोणी ना कोणी वाद निर्माण करतोच. माझ्यासाठी ही नवी बाब नाही. ह्याला मिळायला नको, त्याला मिळायला हवा. ठीक आहे, मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या!"
संबंधित बातम्या
'प्रियदर्शन परीक्षक असल्यामुळे अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार'
26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
National Film Awards : ‘कासव’ने पुरस्कारांची शर्यत जिंकली