ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन त्यानं या सगळ्या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमार म्हणाला की, 'मागील काही दिवसांपासून माझ्या मनात याविषयी विचार सुरु आहे आणि आज ते मी व्यक्त करतो. त्यामुळे कुणाचाही अपमान करणाचा माझा हेतू नाही...'
पाहा व्हिडिओमध्ये अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला...
'ते आहेत म्हणून तुम्ही आहात, ते आहेत म्हणून हिंदुस्थान आहे'
'आज मी तुमच्याशी एक स्टार किंवा सेलिब्रिटी म्हणून बोलत नाही. तर मी तुमच्याशी बोलतोय ते एका सैनिकाच्या मुलाप्रमाणे.
अनेक दिवसांपासून मी पाहतो आहे की, मीडियामधून आपलेच लोक आपल्याच लोकांशी तावातावानं चर्चा करीत आहे. कोणी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे, तर कुणी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करत आहे, तर कुणाला भीती वाटते की युद्ध होईल की काय?
अरे जरा शरम वाटू द्या... ही चर्चा नंतर करा. पहिले हा विचार करा की, कुणीतरी सीमेवर आपले प्राण दिले आहेत. 19 जवान उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर एक 24 वर्षाचा जवान नितीन यादव बारामुलामध्ये शहीद झाला आहे.
त्या जवानांचे कुटुंबीय आणि आपल्या देशातील हजारो सैनिकांच्या कुटुंबीयांना याची चिंता आहे का? की कोणता सिनेमा प्रदर्शित होणार आहे किंवा कोणत्या कलाकाराला बॅन केलं जाणार? नाही... त्यांना फक्त एकच काळजी आहे. ती म्हणजे त्यांच्या भविष्याची... आणि आपली चिंता असली पाहिजे कि त्यांचं वर्तमान आणि भविष्य चांगलं असलं पाहिजे आहे. त्यामुळे ते आहेत तर मी आहे... ते आहेत म्हणून तुम्ही आहात... आणि ते नसतील तर हिंदुस्थान नसेल... जयहिंद!'
VIDEO: