Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडमधील खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लवकरच त्याच्या 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय हा सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटामधील एका अॅक्शन सीनचं शूटिंग करण्यासाठी अक्षय हा स्कॉटलँड येथे गेला होता. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. अक्षयच्या गुडख्याला दुखापत झाली आहे. 


एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) अॅक्शन सीन शूट करताना अक्षयला दुखापत झाली. अक्षयला यावेळी गुडख्याला किरकोळ जखम झाली आहे. अक्षयनं जखमी अवस्थेतच शूटिंग पूर्ण केलं. अक्षयनं दुखापत झाल्यानंतर क्लोज अप शॉट्स शूट करण्याचा निर्णय घेतला. 


'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबतच सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. 'बडे मियां छोटे मियां'च्या टीमनं  स्कॉटलँडलापूर्वी भारतातील मुंबई येथे पहिले शेड्यूल पूर्ण केले. 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटात अक्षय आणि टायगरची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






अक्षयचे आगामी चित्रपट


अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'सेल्फी' (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या  चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकमध्ये देखील अक्षय काम करणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि राधिका मदानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.


2022 मध्ये रिलीज झालेले 'बेल बॉटम' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. त्यामुळे आता अक्षयच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Akshay Kumar: '100 टक्के माझी चूक'; बॅक टू बॅक फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवर अक्षयची प्रतिक्रिया