'ढिशूम'मध्ये अक्षय कुमारचा कॅमियो, डॅशिंग लूक समोर
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 06:40 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या डॅशिंग लूकने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्या आगामी 'ढिशूम' सिनेमात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्टलूक रिलीज झाला असून त्यात तो अतिशय कूल दिसत आहे. जेट-स्कीवर स्वार आणि मोठे केस असा फोटो स्वत: अक्षयने ट्विटरवर पोस्ट केला आहे. "कॅमियो रोलचं शूटिंग. माझा मित्र साजिद, जॉन, वरुण, जॅकीला माझ्याकडून खूप शुभेच्छा, ढिशूम," असं या फोटोसह लिहिलं आहे. https://twitter.com/akshaykumar/status/757736294403407873 सिनेमाचे कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. निर्माता-दिग्दर्शकांना सिनेमात नवं काहीतरी करायचं होतं. म्हणूनच त्यांनी अक्षयला कॅमियो रोलमध्ये आणलं. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे अक्षय आणि जॉन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.