'जॉली एलएलबी 2' साठी अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी रुपये!
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2016 07:48 AM (IST)
मुंबई : 'जॉली एलएलबी 2' मध्ये अर्शद वारसीऐवजी खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवी बाब समोर आली आहे. ती म्हणजे या भूमिकेसाठी अक्षय कुमार फार जास्त मानधन घेत आहे. अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 2' साठी प्रत्येक दिवसाचे एक कोटी रुपये घेत आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अक्षयने निर्मात्यांना प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने पैसे देण्यास सांगितलं आहे सामान्यत: बॉलिवूड सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास सुमारे 40-45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 'जॉली एलएलबी 2'चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत अक्षय कुमार चांगलीच कमाई करणार आहे.