मुंबई : भारतीय सैन्य दलाने केलेल्या एअर स्ट्राईकची कथा मांडणाऱ्या 'उरी' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य धरच्या धुरंदर (dhurandar) सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे, सोशल मीडियावर या सिनेमाचे (Cinema) रिल्स तुफान व्हायरल झाले असून अभिनेता विनोद खन्नाच्या अभिनयावर चाहते फिदा झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरात तब्बल 218 कोटींच्या कमाईसह या सिनेमानं 200 कोटी क्लबमध्ये दिमाखात एण्ट्री घेतलीय. एकीकडे भारतात या सिनेमावर रसिक भरभरून प्रेम करत असताना आखाती देशात मात्र या सिनेमाला बंदीचा सामना करावा लागतोय. 

Continues below advertisement

आखातातल्या सौदी अरेबियासह सहा देशांनी या सिनेमावर बंदी घातलीय. यावर साहजिकच हा प्रश्न पडू शकतो की या सहा देशांनी धुरंधरवर बंदी का घातली? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर पाकिस्तान. या बंदीमागे आहे पाकिस्तान, या सहा देशांच्या सेन्सॉर बोर्डाला हा सिनेमा पाकिस्तानविरोधी नॅरेटिव्ह पसरवणारा आहे, असं वाटलं आणि म्हणून त्यांनी बंदीचा हा निर्णय घेतला. अर्थात पाकिस्तान विरोध करेल अशीच या सिनेमाची गोष्ट आहे. भारताचा एक गुप्तहेर पाकिस्तानात जाऊन एक मिशन यशस्वीपणे राबवतो हे पाकिस्तानला कसं रुचेल? त्यातूनच मग हे बंदीचं शस्त्र उपसलं गेलं. अर्थात आजवर शाहरुख खान आणि सलमान खानचे अनेक बॉलिवुडपट आखाती देशात भरभरून चाललेत आणि तिथून कोट्यवधींची कमाई झालीय. उदाहारणच द्यायचं झालं तर जवान सिनेमाने इथून 147 कोटी रुपये कमवले, पठाण 118 कोटी  बजरंग भाईजान 79 कोटी, दंगल 74 कोटी, सुलतान सिनेमाने 72 कोटी कमावले आहेत.  आखाती देशांमधून बॉलिवूडची अशी तगडी कमाई झालीय. अर्थात धुरंधरच्या निर्मितीवेळीच निर्मात्यांना असं काही होईल याचा अंदाज होता. त्यामुळे निर्मात्यांनी त्यानुसारच कमाईचे आकडे गृहित धरले होते. जरी आखाती देशांनी धुरंधरला रोखलं असलं तरी बॉलिवुडपटांचा सर्वात मोठा चाहता असलेल्या भारतात या सिनेमाचा वारू सुसाट धावतोय. येत्या आठवड्यात हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल असा सिनेसमिक्षकांचा अंदाज आहे. या चित्रपटात रणवीर सिंगचा करिश्मा तर आहेच मात्र सरप्राईज पॅकेज ठरलाय तो रहमान डकैत साकारणारा अक्षय खन्ना. जे यश हिरोच्या भूमिकेनं दिलं नाही, ते व्हिलन बनून वाट्याला येतंय. त्याचा डान्स असेल किंवा मग संवादातून दिसणारा अॅटिट्यूड. अक्षय खन्ना चाहत्यांना प्रचंड आवडतोय. सोशल मीडियातून दिसणारी त्याची क्रेझ… व्हायरल होणारे रील्स हे सगळं प्रेक्षकांना थिएटरपर्यंत येण्यास भाग पाडतंय. त्यामुळंच आखाती देशांनी बंदी घातली असली तरी धुरंधरची जादू कमी होणार नाही, उलट वाढतच जाईल यात शंका नाही.

आखातातल्या सहा देशांनी या सिनेमावर बंदी घातलीय. 

बहरीनकुवेतओमानकतार सौदी अरेबिया यूएई 

Continues below advertisement

हेही वाचा

बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा धमाका! रणवीरच्या चित्रपटाने 7 दिवसांत केली जगभरात विक्रमी कमाई