Akash Ambani-Shloka Ambani Daughter's Name : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका अंबानी (Shloka Ambani) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता त्यांच्या लाडक्या लेकीचं नुकतचं नामकरण करण्यात आलं आहे. 


पृथ्वीने केली धाकट्या बहिणीच्या नावाची घोषणा


आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांच्या लेकीचं नुकतचं बारसं झालं असून लाडक्या लेकीचं नाव त्यांनी 'वेदा' असं ठेवलं आहे. 'वेदा' हे संस्कृत नाव असून याचा अर्थ ज्ञान असा होतो. अंबानी कुटुंबियांनी एक खास कार्ड शेअर करत नावाची घोषणा केली आहे. या कार्डवर लिहिलेलं आहे,"श्रीकृष्ण आणि धीरुभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या आशीर्वादाने पृथ्वीने त्याची धाकटी बहीण वेद आकाश अंबानीच्या नावाची घोषणा केली आहे". या कार्डवर अंबानी आणि मेहता कुटुंबातील सदस्यांची नावेदेखील आहेत. 






नेटकऱ्यांकडून अंबानींचं कौतुक


मुकेश अंबानी यांनी त्यांच्या नातीचं नाव 'वेदा' असं ठेवल्याने त्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ज्या मुलींचं नाव वेदा असतं त्या खूप चांगल्या असतात, पृथ्वी आणि वेदा दोन्ही नावं खूप विचार करुन ठेवलेली वाटतात, वेदा खूपच चांगलं नाव, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना 31 मे 2023 रोजी कन्यारत्न झाले. वेदा ही आकाश आणि श्लोका यांची दुसरी मुलगी आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव पृथ्वी असून तो दोन वर्षांचा आहे. एप्रिल महिन्यात नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान श्लोका अंबानीच्या बेबी बंपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी मार्च 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, गौरी खान, बच्चन कुटुंबिय, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. 


संबंधित बातम्या


Akash Ambani Shloka Ambani: अंबानी कुटुंबात छोट्या परीचे आगमन; आकाश आणि श्लोकाला कन्यारत्नाचा लाभ