Ajay Purkar New Home : मराठमोळा अभिनेता 'पावनखिंड' (Pawankhind) फेम अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी घोडखिंडीत जी लढाई झाली त्याच भूमीत घर बांधलं आहे.'आई बाबांचे घर' (Aai Babancha Ghar) असं त्यांनी या घराला नाव दिलं आहे. अजय पुरकर यांनी 'पावनखिंड' या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) यांची भूमिका साकारली होती. त्यांचा हा सिनेमा चांगलाच गाजला.


अजय पुरकर यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नव्या घराबद्दल सांगितलं आहे.  अजय पुरकर यांनी विशालगडाच्या पायथ्याशी नवं घर बांधलं आहे. या घरात टीव्ही, फ्रीज, एसी अशा गोष्टी नाहीत. याबद्दल बोलताना अजय पुरकर म्हणाले,"टीव्ही, फ्रीज, एसीसह मी या घरात पंखेदेखील लावलेले नाहीत. मला वाटतं या घरात पंखाही लावण्याची आवश्यकता नाही".






अजय पुरकर म्हणाले,"आमच्या घरात येणाऱ्या पाण्याचीही खास गोष्ट आहे. घरात येणारं पाणी हे डोंगरातून पाझरुन येतं. या ठिकाणचं पाणी आयुष्यात प्यायलेलं सर्वोत्तम पाणी आहे. पिण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी एकाच पाण्याचा वापर केला जातो. मी गंमतीने या पाण्याला 'आंबा बिसलरी' असं म्हणतो. या पाण्यात जास्त गुणधर्म नसल्याने पचनक्रिया सुधारते". 


अजय पुरकर यांच्या बेडरुमचीदेखील एक खासियत आहे. निर्सगात घर बांधलेलं असल्यामुळे वाळवी लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे लाकूड आणि लोखंडाचा वापर त्यांनी केलेला नाही. बेड म्हणून त्यांनी चौथरा बांधलेला आहे. घरातील खिडक्यादेखील खास आहेत. खिडकीजवळचा कट्टा हा अजय पुरकर यांचा घरातील आवडता कॉनर्र आहे. 


'पावनखिंड' हा सिनेमा 19 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटिला आला होता. कोरोनानंतर मराठी सिने-प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम 'पावनखिंड' या सिनेमाचं केलं आहे. 'पावनखिंड' या ऐतिहासिक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. 


अजय पुरकर यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ते तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Subhedar: हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार' चित्रपटातील अजय पुरकर यांच्या लूकनं वेधलं लक्ष