Ajay Devgn Proprety:  अनेक सेलिब्रिटी हे प्रॉपर्टीमध्ये पैसे इनव्हेस्ट करत असतात. बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगणनं (Ajay Devgn) देखील आता मुंबईमध्ये पाच ऑफिस युनिट्स विक घेतले आहेत. हे ऑफिस युनिट्स अजयनं कोट्यवधींना विकत घेतले आहे. जाणून घेऊयात अजयच्या या नव्या प्रॉपर्टीबद्दल...


अजयने मुंबईतील अंधेरी वेस्ट या भागात ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक केली आहे. अजयच्या या नव्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 45 कोटी रुपये आहे, असं म्हटलं जात आहे. अजयने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.


एका रिपोर्टनुसार, अजयचं हे ऑफिस युनिट्स 13 हजार 293 स्केअरफिट एरियामध्ये बांधण्यात आलेलं आहे. या ऑफिस युनिटमधील पहिलं युनिट 8 हजार 405 स्केअर फिटमध्ये बांधण्यात आलं आहे. हे युनिट ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगच्या 16 व्या मजल्यावर आहे. या युनिटची किंमत 30.35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आणि अजयने  यासाठी 1.82 कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर स्वाक्षरी केली आहे, असंही म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, दुसरे युनिट त्याच इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आहे. या युनिटचा बिल्ट अप एरिया 4 हजार 893 स्क्वेअर फूट आहे. अजयच्या मूळ नावाने म्हणजेच विशाल वीरेंद्र देवगण या नावाने 19 एप्रिल 2023 रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.






अजयचे चित्रपट


1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटाच्या माध्यामातून अजयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं दिलवाले,धनवान, विजयपथ, प्यार तो होना ही था या चित्रपटांमध्ये देखील काम केलं. अजय देवगणने चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपटदेखील  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भोला या चित्रपटाचं अनेक जणांनी कौतुक केलं. भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच  तब्बू,  दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता त्याचा सिंघम-3 हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. अजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


बॉलिवूडचा सिंघम आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या अजय देवगणच्या संपत्तीबाबत...