मुंबईः गणेश चतुर्थीनिमित्त टी-सीरिज आणि अभिनेता अजय देवगनने 'गजानना' हे बाप्पाचं खास गाणं रिलीज केलं आहे. प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर जीत गांगुली यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.   गणेशोत्सवासाठी खास गाणं सादर केल्याची माहिती अजय देवगणने ट्विटरद्वारे दिली. या गाण्यात सुखविंदर सिंह यांचा भारदस्त आवाज गाण्याचं खरं आकर्षण आहे. गणेश भक्तांकडून या गाण्याला मोठी पसंती दिली जात आहे. https://twitter.com/ajaydevgn/status/772699155500195840 अजय देवगनचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय' येत्या 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. त्यापूर्वी त्याने गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे.   पाहा व्हिडिओः