'ऑनलाईन शॉपिंगची चाहती आहे काजोल,' अजय देवगनचा खुलासा
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2021 12:13 PM (IST)
बॉलीवूड स्टार अजय देवगनने एका कार्यक्रमात सांगितले की, "काजोल ऑनलाईन शॉपिंगची किती मोठी चाहती आहे".
मुंबई : अजय देवगन आणि काजोलचे लग्नाला 22 वर्षे झाले आहे. लग्नाआधी बराच काळ ते दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, मग त्या दोघांनी लग्न केले. त्यामुळेच ते दोघे एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. जेव्हा संधी मिळते तेव्हा एकमेकांबद्दलचे किस्से सांगतात. तसचं आता अजय देवगनने एका कार्यक्रमात सांगितले की, 'काजोल ऑनलाईन शॉपिंगची मोठी चाहती आहे'.
काजोल खूप करते ऑनलाईन शॉपिंग काजोल नव्वदच्या दशकातली सुपरस्टार अभिनेत्री होती. आजही ती चित्रपटांत दिसून येते. तरीही तिला महाग किंवा ब्रॅंडेड गोष्टी विकत घ्यायला आवडत नाहीत. उलट ती स्वस्त आणि टिकाऊ गोष्टी विकत घेण्यावर अधिक भर देते. खुद्द अजय देवगण म्हणाला की, 'काजोल ऑनलाईन शॉपिंग इतकी करते की घरी दरदोज 4 ते 5 पार्सल तिच्या नावावर येतात. त्यातील सर्व ऑनलाईन खरेदी केलेल्या गोष्टीच असतात'. डिस्काउंटमध्ये खरेदी करणं करते पसंत अजय देवगणने सांगितले की, 'काजोलला डिस्काउंटमध्ये खरेदी करायला आवडते'. पण अजय मात्र डिस्काउंट, सेल आणि कमी भाव अशा भानगडीमध्ये पडत नाहीत तर त्याला जेव्हा जी गोष्ट आवडेल तेव्हा ते ती घेतो. काजोल त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. ती कमीत कमी पैशात जास्तीत जास्त उपयोगी वस्तू घेण्यावर भर देते. ती वस्तूंची मूळ किंमत कमी करण्यात पण माहिर आहे. एका कार्यक्रमात चक्क काजोल म्हणाली होती की, जर तिला एखादी बॅग खरेदी करायची असेल तर ती जास्तीत जास्त खिसे असलेल्या बॅग खरेदी करते जेणेकरुण त्यात तिला भरपूर सामान ठेवता येईल.