Aitraaz 2 Movie : बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेलचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. आणखी एका हिट चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. अब्बास-मस्तान दिग्दर्शित ऐतराज चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा स्टाटर ऐतराज चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. 12 नोव्हेंबरला या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 20 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. ऐतराजचे निर्माते सुभाष घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ऐतराज चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचं कन्फर्म झालं आहे.

Continues below advertisement

अक्षय-करीना-प्रियंकाच्या चित्रपटाचा सीक्वेल कंन्फर्म

2004 मध्ये आलेल्या ऐतराज चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. अब्बास-मस्तान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सुभाष घई चित्रपटाचे निर्माते होते. दरम्यान, निर्माते सुभाष घई यांनी ऐतराज 2 ची घोषणा केली आहे. यासोबतच आता ऐतराज 2 चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमित राय ऐतराज 2 चं दिग्दर्शन करणार असल्याची माहिती आहे. लेखक-दिग्दर्शक अमित राय यांनी ओह माय गॉड 2 चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

ऐतराज 2 चित्रपटाची घोषणा

12 नोव्हेंबरला ऐतराज चित्रपट प्रदर्शित होऊन 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही या चित्रपटाची कथा आणि पात्र यांची प्रेक्षकांच्या मनावरील छाप कायम आहे. चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होण्याचं निमित्त साधत चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ऐतराज 2 ची घोषणा केली आहे. सुभाष घई यांनी प्रियांका चोप्राच्या बोल्ड अँड ब्युटीफुल भूमिकेचा फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 

Continues below advertisement

20 वर्षांनंतर येणार चित्रपटाचा दुसरा पार्ट

सुभाष घई यांनी प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'बोल्ड अँड ब्युटीफुल प्रियांका चोप्राने हिंमत दाखवली आणि ते करून दाखवलं. त्यामुळेच 20 वर्षांनंतरही प्रेक्षक तिचा अभिनय विसरू शकलेले नाहीत. सुरुवातीला ती ही भूमिका करताना खूप घाबरली होती, पण तिने ती पूर्ण आत्मविश्वासाने साकारली. आता मुक्ता आर्ट्स तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एका उत्तम स्क्रिप्टसह ऐतराज 2 साठी सज्ज आहे. वेट अँड वॉच'.

सुभाष घई यांची पोस्ट

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samantha Ruth Prabhu : 'मला नेहमीच आई व्हायचं होतं...', नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर 3 वर्षांनी समंथाची मातृत्वावर प्रतिक्रिया