Ismile Darbar on Salman Aishwarya Relationship: बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्या रिलेशनशिपपासून ते दोघांमधील भांडणांपर्यंत, मीडिया आणि चाहत्यांचे लक्ष सतत त्यांच्यावर राहिले. आता या दोघांबाबत एक मोठा खुलासा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांनी केला आहे. त्यांनी सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबाबत तसेच संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे काही गौप्यस्फोट केले आहेत.  (Bollywood News) सलमान आणि संजयमध्ये मतभेद होते.ऐश्वर्या रायचा भूतकाळ सलमान खान होता. म्हणूनच संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याविरुद्ध शाहरुख खानला कास्ट केले असं इस्माइल यांनी सांगितलं.

Continues below advertisement

भन्साळी आणि इस्माईल दरबार यांच्यातील मतभेद

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळींना गर्विष्ठ म्हणत आता शंभर कोटी रुपये ऑफर केले तरी त्यांच्यासोबत काम करणार नाही असं म्हटलं .खरंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक आणि म्युझिक डिरेक्टर अशी जोडी विचारली तर त्यात संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार या जोडीचं नाव येतंच. 'हम दिल दे चुके सनम' असो किंवा देवदास संजय लीला भन्साळींच्या बहुतांश  कलाकृतींमध्ये इस्माईल दरबार यांचंच संगीत आहे . पण सध्या इस्माईल दरबार आणि संजय लीला भन्साळी या दोघांमध्ये कटूता आल्याचं दिसतंय .अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळींना गर्विष्ठ म्हणून केले तरी त्यांच्यासोबत काम करणार नाही असे म्हटलंय . याच मुलाखतीत ' हम दिल दे चुके सनम' या सिनेमादरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्याचा नात्यावरही ते बोललेत .

'ऐश्वर्याचा भूतकाळ सलमान होता म्हणूनच देवदासमध्ये... '

ते म्हणाले की "हम दिल दे चुके सनम" आणि "देवदास" च्या कास्टिंगवरून खूप वाद झाला होता, परंतु दोन्ही चित्रपट हिट ठरले. इस्माइलने स्पष्ट केले की संजय लीला भन्साळींनी देवदासमध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. सलमान आणि संजयमध्ये मतभेद होते. ऐश्वर्या रायचा भूतकाळ सलमान खान होता. म्हणूनच संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याविरुद्ध शाहरुख खानला कास्ट केले असं इस्माइल यांनी सांगितलं. 'त्यांच्यातील भांडणे माध्यमांमध्ये राहिली. त्यांना वाईट वाटले कारण ते खूप जवळचे होते. त्यांनी भांडायला नको होते, पण सलमान आता या गोष्टींबद्दल बोलत नाही. दोघेही आयुष्यात पुढे गेले आहेत.

Continues below advertisement

सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध का बिघडले?

इस्माइल दरबार म्हणाले, "जेव्हा मला कामाची गरज होती, तेव्हा त्यांनी मला 'हम दिल दे चुके सनम' मध्ये काम दिले आणि जेव्हा त्याला माझी गरज होती, तेव्हा मी माझे सर्व काम सोडून त्याला पाठिंबा दिला. कारण तो इंडस्ट्रीमध्ये माझा गॉडफादर होता." इस्माइल म्हणाले, "मला वाटते की सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडले कारण त्याने सलमानऐवजी देवदास चित्रपटात शाहरुख खानला कास्ट केले. खामोशी फ्लॉप झाला तेव्हाही सलमानने त्याला पाठिंबा दिला. आता, हे स्पष्ट आहे की, जर मी तुला दोनदा मदत केली आणि तू तिसऱ्यांदा माझ्या प्रतिस्पर्ध्याला कास्ट केले तर ते त्रासदायक होईल." आणि तेव्हापासून, त्यांच्या नात्यात कटुता आली आहे.