मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय हे मागील काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या वडिलांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. तसेच आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
वडिलांना आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत काल रात्री रुग्णालयात गेली होती. अमेरिका दौऱ्याहून परतलेला अभिषेक तात्काळ ऐश्वर्यासोबत रुग्णालयात गेला.
कृष्णराज राय हे मागील दोन आठवड्यापासून रुग्णालयातील सामान्य वॉर्डमध्ये होते. पण आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.