नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर एम्सने आपला वैद्यकीय अहवाल दिला आहे. यात सुशातने आत्महत्याचं केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (एम्स) सोमवारी सांगितले की, वैद्यकीय मंडळाने अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दलचा अहवाल केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सादर केला आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती त्यांच्याकडूनचं मिळेल.


एम्स गुन्हेगारीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की वैद्यकीय मंडळाने सुशांतची आत्महत्याचं झाली असल्याचे सांगितलं होतं. सुशांतने फाशी लावून जीवन संपल्याचे अहवालात सांगितले आहे.


सीबीआयला दिलेल्या आपल्या वैद्यकीय-कायदेशीर मतानुसार, सहा सदस्यीय वैद्यकीय पथकाने 'विषबाधा व गळा दाबून खून केल्याचा' दावा फेटाळून लावण्यात आला आहे. गुप्ता म्हणाले की, टीमला व्हिसेरामध्ये विष किंवा ड्रग्ज पदार्थांचा कोणताही अंश मिळाला नाही.


सोमवारी एम्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "नवी दिल्लीतील एम्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एक मेडिकल बोर्ड स्थापन केला होता. कारण, सीबीआयने त्यांना सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात तज्ञांचा सल्ला मागितला होता.


एम्सकडून सांगण्यात आले आहे, की "मेडिकल बोर्डाने आपला अहवाल थेट केंद्रीय अन्वेषण ब्युरोला सादर केला होता. कायदेशीर विषय असल्याने मेडिकल बोर्डाने सादर केलेल्या अहवालाची कोणतीही माहिती सीबीआयकडून घ्यावी लागेल."


रिया चक्रवर्तीला सोडा.. एम्सच्या रिपोर्टनंतर स्वरा भास्करची मागणी


अहवालावर प्रश्नचिन्ह


मेडिकल बोर्डाचा तपासणी अहवाल आणि डॉ. गुप्ता यांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.


सीबीआयकडे सादर केलेल्या एम्सच्या वैद्यकीय अहवालाने अस्वस्थ असल्याचे राजपूत कुटुंबाचे वकील अ‍ॅड. विकास सिंह यांनी सांगितले. या प्रकरणात नवीन फॉरेन्सिक टीमची स्थापना करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी ट्वीट केले आहे, की "एम्सची टीम शवविच्छेदनाविना आणि खासकरुन कूपर हॉस्पिटलने (मुंबई) केलेल्या वाईट पोस्टमॉर्टमवरुन कसा निष्कर्ष काढू शकते, ज्यात मृत्यूच्या वेळेचा देखील उल्लेख नाही."


शनिवारी डॉ. गुप्ता म्हणाले, "ही फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना आहे. आम्ही आमचा अंतिम अहवाल केंद्रीय अन्वेषण ब्युरोला सादर केला आहे. "


ते म्हणाले की फाशीशिवाय शरीरावर कोणतीही जखम नाही आणि संघर्ष केल्याचीही कोणत्याही खुणा नाहीत. मानेवरच्या खुणा या फाशीशी जुळतात.


डॉ. गुप्ता यांनी पीटीआयला सांगितले की, डॉक्टरांच्या पथकाला व्हिसेरामध्ये विष किंवा ड्रगचा कोणताही अंश सापडला नाही. परंतु, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आणखी काही बोलण्यास नकार दिला.


सुशांत (वय 34) हा 14 जूनला मुंबईच्या उपनगरी भागात वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सीबीआयने बिहार पोलिसांकडून तपास आपल्या ताब्यात घेतला. पटनामध्ये राजपूतचे वडील केके सिंग यांनी राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप दाखल केला होता.


Param Bir Singh PC | SSR Suicide Case | मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : परमबीर सिंग