Kedar Shinde On Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Maharashtra Maza) हे गीत ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


केदार शिंदे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात. आता त्यांनी त्यांचे आजोबा शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. 


केदार शिंदे यांची खास पोस्ट (Kedar Shinde Post)


केदार शिंदे यांनी लिहिलं आहे,"माझा खरा हीरो... शाहीर साबळे. बाबा तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावत निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 'जय जय मराराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं आहे". 






केदार शिंदे यांनी पुढे लिहिलं आहे,"1960 पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलं आहे. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील. या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनमादेखील येईल. आत्मा जागृत नसतो आणि तो जे आपल्याला हवं ते करुन घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. 28 एप्रिल रोजी तेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल". 


गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. 'गर्जा महाराष्ट्र' या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. या गीताचे गायक शाहीर साबळे हे आहेत. या गीताने संपूर्ण म्हाराष्ट्राला वेड लावलं आहे. 


संबंधित बातम्या


शिवजयंतीपासून गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, शिंदे-फडणवीस कॅबिनेटचा निर्णय