'सोनू...' गाण्यामुळे रिअल लाईफ सोनूंची चिडवाचिडवी
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 06:31 PM (IST)
आधी शांताबाईच्या गाण्यानं धुमाकूळ घातला. शांताबाई शांत होत नाही तोच 'आला बाबुराव'नं राज्यभर दणका उडवला. आता त्यावर कळस गाठला आहे तो सोनूनं.
पिंपरी : 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा न्हाय काय?' या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याच्या अनेक आवृत्त्या पाहायला मिळत आहेत. मलिष्कापासून पाकिस्तानी तरुणांपर्यंत अनेकांनी 'सोनू'ची गाणी गायली, मात्र त्यामुळे सोनू नाव असणाऱ्या मुला-मुलींनी आपली थट्टा होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. आधी शांताबाईच्या गाण्यानं धुमाकूळ घातला. शांताबाई शांत होत नाही तोच 'आला बाबुराव'नं राज्यभर दणका उडवला. आता त्यावर कळस गाठला आहे तो सोनूनं. या गाण्यामुळे आपल्याला तोंड उघडण्याची सोय राहिलेली नाही. कशावर मत व्यक्त केलं की "सोनू तुझा माझ्यावर भरवसा न्हाय काय?" असं म्हणून त्यांचे मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीय त्यांची टर उडवतात. यामुळे संतापलेल्या 'सोनू' नावाच्या मुला-मुलींनी न चि़डवण्याचं जाहीर आवाहन केलं आहे.