Adipurush Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे. या सिनेमातील संवाद, व्हीएफएक्सवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. रिलीज होण्याआधीपासूनच ओम राऊतचा (Om Raut) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता रिलीजच्या चौथ्या दिवशीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या सिनेमात रामाच्या भूमिकेसाठी प्रभास (Prabhas) ऐवजी कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिग्दर्शकाची पहिली पसंती होती.
केआरकेचा मोठा खुलासा
केआरके उर्फ कमाल रशिद खान नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेकदा तो बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधत असतो. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते. पण आता त्याचं एक ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्याने ट्वीट केलं आहे की,"आदिपुरुष' सिनेमातील रामाच्या भूमिकेसाठी प्रभास नव्हे तर कार्तिक आर्यन दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. पण कार्तिकने या सिनेमासाठी नकार दिल्याने निर्मात्यांनी प्रभासला विचारणा केली".
केआरके म्हणाला,"तान्हाजी' सिनेमाबद्दल बोलताना त्यावेळी मी म्हणालो होतो की, ओम राऊतला दिग्दर्शन करता येत नाही आणि आज 'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर मला वाटतं की, मी 100 % बरोबर होतो. मी कायम सत्यच बोलतो. कार्तिक आर्यनने 'आदिपुरुष' सिनेमाला होकार दिला ही एक चांगली गोष्ट आहे".
'आदिपुरुष' सिनेमासाठी प्रभासने किती मानधन घेतलं आहे?
'आदिपुरुष' सिनेमासाठी प्रभासने चांगलच मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी त्याने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बाहुबली' या सिनेमासाठी त्याने 40 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. त्याची एकूण संपत्ती 215 कोटी रुपयांच्या आसपास आहे, असे म्हटले जात आहे.
'आदिपुरुष'च्या कमाईबद्दल जाणून घ्या...
'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत 241 कोटींची कमाई केली आहे. 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.1 कोटी आणि चौथ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 241.10 कोटींची कमाई केली आहे. पण रिलीजच्या चौथ्याच दिवशी या सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे.
संबंधित बातम्या