Adipurush Movie : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरातील 6,200  स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जगभरातील सिनेप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत असून रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरत आहे. 'आदिपुरुष'च्या यशात मराठमोळ्या कलाकारांचा मोठा वाटा आहे. 


'आदिपुरुष'मध्ये देवदत्त नागे दिसणार हनुमानाच्या भूमिकेत


'आदिपुरुष' या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने (Devdatta Nage) लक्षवेधी भूमिका साकारली आहे. तो या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे. हनुमान जयंतीनिमित्त 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला होता. तेव्हापासून देवदत्तचे चाहते 'आदिपुरुष' सिनेमात देवदत्तला पाहण्याची प्रतीक्षा करत होते. 'आदिपुरुष' हा देवदत्त नागेचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. याआधी तो 'तान्हाजी' या सिनेमात झळकला होता. 






तेजस्विनी पंडितनं साकारली शुर्पणखाची भूमिका


'आदिपुरुष' या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) शुर्पणखाची भूमिका साकारली आहे. तेजस्विनीने गेल्या काही दिवसांपूर्वी ती 'आदिपुरुष' सिनेमात झळकणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण ती नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याबद्दल तिने खुलासा केला नव्हता. तसेच निर्मात्यांनीदेखील यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नव्हती. पण 'आदिपुरुष' सिनेमात शुर्पणखाच्या भूमिकेत तेजस्विनीला पाहूण मराठी प्रेक्षकांना खूपच चांगलं सरप्राईज मिळालं आहे. 


मराठमोळ्या ओम राऊतने केलंय 'आदिपुरुष'चं दिग्दर्शन


सुपरहिट सिनेमे देणाऱ्या मराठमोळ्या ओम राऊतने (Om Raut) 'आदिपुरुष' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आजच्या मुलांना रामायणाबद्दल फारसं माहिती नसल्याने त्याने 'आदिपुरुष' सिनेमा बनवला असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ओम राऊतचे 'लोकमान्य : एक युग पुरुष', 'तान्हाजी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 


'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan), सनी सिंह (Sunny Singh) आणि देवदत्त नागे (Devdatta Nage) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.


संबंधित बातम्या


Adipurush Twitter Review: 'वीएफएक्स खराब पण चित्रपट चांगला'; आदिपुरुष पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया