Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Adipurush Box Office Collection)


'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


'आदिपुरुष' ऑनलाईन लीक


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजच्या काही तासांतच ऑनलाईन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास आणि कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा एचडी प्रीन्टमध्ये फिल्मीझिला, 123 movies, फिल्की वॅप, ऑनलाईन मूव्ही वॉचेस, टेलिग्राम, तामिळ रॉकर्ससारख्या साईटवर उपलब्ध आहे. या साईटवर प्रेक्षक मोफक 'आदिपुरुष' हा सिनेमा पाहू शकतात. 


'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त हिंदीत 37 कोटींची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये 48 कोटी, मल्याळम चार लाख, तामिळ सात लाख आणि कन्नडमध्ये चार लाख रुपयांची कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रदर्शनावर नेपाळमध्ये बंदी


'आदिपुरुष' सिनेमाविरोधात नेपाळमध्येही विरोध होत आहे. सिनेमात सीतेचे वर्णन भारताची कन्या म्हणून करण्यात आले आहे. पण सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूरात झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनावर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर निर्मात्यांनी सीतेला भारताची कन्या म्हणून वर्णन करणारं दृश्य काढून टाकलं आहे.




'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तब्बल 6,200 स्क्रीन्सवर 2 डी आणि 3 डीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला असल्याचं समोर आलं आहे. आता प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत सिनेमातील वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.  


संबंधित बातम्या


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती