Karan Deol Drisha Acharaya Wedding : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांचा लेक करण देओल (Karan Deol) नुकताच सिने-दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या नातीसोबत म्हणजेच द्रिशा आचार्यसोबत (Drisha Acharaya) लग्नबंधनात अडकला आहे. मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
करण देओलच्या वरातीत त्याच्या कुटुंबातील मंडळी ढोल-ताशांच्या तालावर थिरकताना दिसले. यात सनी देओल, बॉबी देओल, आजोबा धर्मेंद्र, अभय देओल , राजवीर देओल यांचा सहभाग होता. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करण आणि द्रिशाचा साखरपुडा पार पडला आहे.
करण देओल आणि द्रिशाच्या लग्नाचं आज (18 जून) संध्याकाळीच रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनचं आयोजनदेखील ताज लॅन्ड्स एन्डमध्ये करण्यात आलं आहे. नातवाच्या वरातीत धर्मेंद्र थिरकताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या लग्नात सनी देओलचादेखील एक वेगळा स्वॅग पाहायला मिळाला.
धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्याप्रमाणे करण देओलनेदेखील सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 2019 साली 'पल पल दिल के पास' (Pal Pal Dil Ke Pass) या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. करणचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्यामुळे करण नाराज झाला होता. त्यानंतर बॉबी देओल यांनी त्याला समजावलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये त्याने 'वेल्ले' या सिनेमात काम केलं.
द्रिशा आचार्यबद्दल जाणून घ्या... (Who IS Drisha Acharaya)
द्रिशा ही सिने-दिग्दर्शक विमल रॉय यांची नात आहे. गेल्या सहा वर्षांपासून द्रिशा आणि करण देओल एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा तिच्या आई-बाबांसोबत 1989 पासून दुबईमध्ये राहत आहे. सध्या ती ट्रॅव्हल इंडस्ट्रिमध्ये कार्यरत आहे. द्रिशा सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
सनी देओलचा गदर : एक प्रेम कथा हा चित्रपट 9 जून रोजी रि-रिलीज करण्यात आला. या चित्रपटामधील सनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सनी देओलच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या