मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईनवरुन ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. मात्र आता तर चक्क अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.


अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन खरेदी करताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची फसवणूक झाली आहे. सोनाक्षीनं एका महागड्या ब्रॅंडचं 18 हजार रुपयांचं हेडफोन मागवले होते. मात्र ऑर्डर मिळाल्यानंतर सोनाक्षीनं जेव्हा बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात चक्क लोखंडी नळाचा तुकडा असल्याचं समोर आलं आहे.





सोनालीनं याबाबत ट्वीट करत अॅमेझॉनकडे तक्रार दाखल केली आहे. अॅमेझॉनच्या ग्राहक सेवेवरही सोनाक्षीनं नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचं ट्वीटही तिनं केलं आहे. सोनाक्षीच्या ट्वीटनंतर अॅमेझॉननं तात्काळ ट्वीट करत माफी मागितली.


ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं याआधीही समोर आली आहेत. मात्र यावेळी चक्क सोनाक्षीची फसवणूक झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे.