अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या संकल्पनेतून एक असा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, ज्यातून सफाई कामगारांचं आयुष्य मांडलं गेलंय. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित 'वन्दे मातरम्' गीत वापरुन सफाई कामगारांचं जीणं समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी किती मेहनत घेतली जाते, हे दाखवण्याचा उद्देश या व्हिडीओचा आहे.
रिंगिंग रेन फिल्म्सची निर्मिती असेलेला हा व्हिडीओ धीरेंद्र आर. के. द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अपार मेहनत घेणाऱ्या कामगारांना सलाम करणं, हा एकमेव उद्देश या व्हिडीओमागे आहे.
VIDEO :
नाले, गटारं, रस्ते साफ करताना सफाई कामगारांना विविध आजारांना तोंड द्याव लागतं. अनेक सफाई कामगार आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडल्याच्याही घटना आहेत. सर्वसाधारण लोक कल्पनाही करु शकत नाहीत, असं भीषण आणि भयंकर वास्तव सफाई कामगारांच्या जगाचं आहे.
मुंबईनगरीचं देखणं रुप टिकवून ठेवण्यासाठी झटणाऱ्या सफाई कामगारांना सलाम देण्यासाठी अभिनेत्री स्मिता तांबे यांनी या व्हिडीओतून प्रयत्न केला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वीही झाला आहे. या व्हिडीओची दखल सर्वसामान्य मुंबईकरांनी घेतली आहेच. मात्र, बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान यानेही या व्हिडीओचं आणि स्मिता तांबे यांच्या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. “In Workers ke liye 'Thanks' toh banta hai.” असं म्हणत सलमानने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ पोस्टही केला आहे.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/821362420106989568