#MeToo : अभिनेत्री सिमरन कौर सुरीचेही साजिदवर गंभीर आरोप
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2018 07:29 AM (IST)
‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या ऑडीशनसाठी साजिदनं आपल्याला ऑफीसचा पत्ता दिला. मात्र प्रत्यक्षात मी तिथं पोहोचले तेव्हा ते त्याचं ऑफीस नसून घर असल्याचं समजलं.
मुंबई : सिनेदिग्दर्शक साजिद खानचे पाय अजून खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेदिग्दर्शिका सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांच्या आरोपानंतर आता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या सिमरन कौर सुरीने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केलाय. ऑडीशनच्या नावाखाली साजिद खाननं आपल्याला कपडे उतरवायला सांगितल्याचा गंभीर आरोप सुरीने केलाय. ‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या ऑडीशनसाठी साजिदनं आपल्याला ऑफीसचा पत्ता दिला. मात्र प्रत्यक्षात मी तिथं पोहोचले तेव्हा ते त्याचं ऑफीस नसून घर असल्याचं समजलं. आणि तिथं त्यानं आपल्याशी गैरवर्तन केल्याचं सुरीने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. साजिदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर साजिदने अनेक महिने माझं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप 'हमशक्ल' सिनेमात साजिदची सहदिग्दर्शक असलेली सलोनी चोप्राने केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाईटनेही साजिदवर आरोप केले होते. साजिद खानची सिनेमातून माघार तर दुसरीकडे या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिदने स्वत:च 'हाऊसफुल्ल 4' च्या दिग्दर्शनातून माघार घेतली आहे. "सत्य समोर येईपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ नका," असं आवाहन साजिदने ट्विटरच्या माध्यमातून मीडियाला केलं आहे. तसंच कुटुंब आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर दबाव येत असल्याने हा निर्णय घेतल्याचं साजिदने सांगितलं. VIDEO : पाहा सिमरन कौर सुरी काय म्हणाली?