कॅनडातील टोरंटोतील माऊंट सिनाईमध्ये बाळाचा जन्म झाला. 23 सप्टेंबरला मुलाचा जन्म झाला असून बाळ-बाळंतीण सुखरुप असल्याचं रंभाच्या पतीने सांगितलं.
कॅनडियन व्यावसायिक इंद्रन पाथमनथनसोबत रंभा 2010 मध्ये विवाहबंधनात अडकली होती. त्यांना सात वर्षांची लान्या आणि तीन वर्षांची साशा या दोन मुली आहेत. 40 व्या वर्षी रंभाला पुन्हा आई होण्याचं भाग्य लाभलं.
मे महिन्यात रंभाने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तिच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर वायरल झाले होते.
'घरवाली बाहरवाली', बंधन, जुडवा यासारख्या चित्रपटांमुळे रंभा गाजली होती. रंभाने काही वर्षांपूर्वी तमिळ चित्रपटसृष्टी गाजवली होती. कमल हसन, रजनीकांत यासारख्या आघाडीच्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत ती झळकली होती. काही वर्षांपूर्वी रंभाने सिनेसृष्टीतून संन्यास घेतला. त्यानंतर ती काही डान्स शोजमध्ये दिसली होती.