Radhika Apte Viral Pics : स्वत:च्या हिमतीवर बॉलिवुडमध्ये नाव कमवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राधिका आपटे या कसलेल्या अभिनेत्रीचे नाव प्राधान्याने घेतले जाते. आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. विशेष म्हणजे तिच्या काही चित्रपटांना वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत. ती नुकतीच आई झाली आहे. असे असतानाच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून याच फोटोवर सडकून टीका केली जात आहे. नेटकरी हा फोटो पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
BAFTA अवॉर्ड्समध्ये पोहोचली राधिका आपटे
राधिका आपटे गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये आई झाली. तेव्हापासून ती आपल्या छोट्या बाळासोबत वेळ घालवते आहे. नुकतेच तिने BAFTA अवॉर्ड्स सोहळ्यास उपस्थित राहिली. या सोहळ्यादरम्यानचा एख फोटो तिने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात ब्रेस्टमिल्क पंप आहे. तर दुसऱ्या हातात एक काचेचा ग्लास आहे. या काचेच्या ग्लासात शॅम्पेन हे मद्य आहे. तिचा हात फोटो पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्यावर टीकादेखील होतेय.
कॅप्शनमध्ये राधिकाने काय म्हटलंय?
राधिकाने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने फोटोमगची पूर्ण कहाणी सांगितली आहे. 'BAFTA अवॉर्ड्स समारंभातील माझी ही खरी परिस्थिती पाहा. मी नताशाचे आभार मानते. कारण तिच्यामुळेच मी या समारंभात येऊ शकले. ब्रेस्टपंपिंगची वेळ लक्षात घेऊनच तिने माझ्या कार्यक्रमाचे नियोजन केले. बाळासाठी दूध काढण्यासाठी ती माझ्यासोबत बाथरुममध्ये आली. सोबतच ती माझ्यासाठी शॅम्पेनही घेऊ आली,' असं राधिका आपटेने आफल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
नव्याने आई झालेल्या महिलेला काम करणे कठीण आहे- राधिका आपटे
पुढे तिने 'नव्याने आई झाल्यानंतर काम करणं फार कठीण आहे. नताशाने माझी ज्या पद्धतीने काळजी घेतली, तशी काळजी घेणारे इंडस्ट्रीमध्ये फार कमी सापडतात,' तिच्या या पोस्टला पाहून तिच्या चाहत्यांनी तिची भरभरून प्रशंसा केल आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलदेखील केलंय. 'मॅडम तुम्ही फार छान आहात. मात्र असं करू नका. तुमच्या हातातील ग्लासमध्ये नेमकं काय आहे?' असं एका नेटकऱ्याने विचारलंय. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने बाळाला दूध पाजत असताना मद्यपान करू नये, असा सल्ला दिलाय. तिसऱ्या एका व्यक्तीने बाळ दूध पित असतानाच्या काळात मद्यप्राशन करणे चुकीचे आहे, असं म्हटलंय. तर अशा प्रकारची पोस्ट करून राधिका आपटे एक चुकीचा मेसेज देऊ पाहतेय, असे म्हणत एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा :
रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडणारे अभिनव चंद्रचूड आहेत तरी कोण? माजी सरन्यायधीशांची आहे खास नातं!