मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह अखेर लगीनगाठ बांधणार आहेत. सात वर्षांपासून दोघं रिलेशनशीपमध्ये असून सध्या ते 'लिव्ह-इन'मध्ये राहतात.
नोव्हेंबर महिन्यात पायल आणि संग्राम लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. 2014 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.
साखरपुड्यानंतर वर्षभरातच विवाह करण्याचा आमचा बेत होता, मात्र कामात व्यस्त असल्यामुळे लग्न पुढे ढकलत राहिलो. प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेली वेळ असते, असं संग्रामला वाटतं.
पायल रोहतगी ‘प्लान’, ‘रक्त’, ’36 चायना टाऊन’ आणि ‘दिल कबड्डी’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली होती. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही पायलने झळकली होती.
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये संग्राम दिसला होता. याशिवाय पायलसोबत नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोमध्येही संग्रामने भाग घेतला होता.
यावर्षी रोशेल राव-कीथ सीक्वेरा, दीपिका कक्कड़-शोएब इब्राहिम, गौतम रोडे-पंखुड़ी अवस्थी, गौरव चोप्रा-हितिशा, रुबीना दिलैक-अभिनव शुक्ला असे अनेकी टीव्हीस्टार लग्नबंधनात अडकले. त्यानंतर पायल-संग्रामही विवाह करत आहेत.