मुंबई : चेक बाऊन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. मॉडेल पूनम सेठीच्या तक्रारीनंतर कोयनाला 1.64 लाखांच्या व्याजासह 4.64 लाख रुपये देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
पूनम सेठीने 2013 साली कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे कोयनाने दिलेला चेक बाऊन्स झाला होता. कोयनाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावत वरच्या कोर्टात आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.
कोयनाने पूनमला वेगवेगळ्या वेळी एकूण 22 लाख रुपये दिले होते. त्यापैकी तीन लाखांचा चेक बाऊन्स झाला होता. त्यानंतर पूनमने 19 जुलै 2013 रोजी कोयनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. मात्र तरीही रक्कम न दिल्यामुळे पूनमने 10 ऑक्टोबर 2013 रोजी कोयनाविरोधात कोर्टात केस दाखल केली.
दरम्यान, पूनम सेठी 22 लाख रुपये उधार देऊ शकेल, इतकी तिची ऐपतच नाही, असा दावा करत कोयनाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. इतकंच नाही, तर पूनमवर आपले चेक चोरल्याचा आरोपही तिने केला. मात्र कोयनाचे सर्व आरोप कोर्टाने फेटाळून लावले.
मूळ कोलकात्याची असलेली 40 वर्षीय कोयना 2001 मध्ये ग्लॅडरॅग्ज मेगा मॉडेल इंडिया स्पर्धेची विजेती ठरली होती. 2002 साली राम गोपाल वर्माच्या 'रोड' सिनेमातून तिने पदार्पण केलं. त्यानंतर मुसाफिर, एक खिलाडी एक हसीना यासारख्या चित्रपटातही ती झळकली.
अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा कारावास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2019 12:24 PM (IST)
कोयना मित्राने दिलेला तीन लाखांचा चेक बाऊन्स झाल्याची तक्रार मॉडेल पूनम सेठीने दिली होती. त्यानंतर दंडाधिकारी कोर्टाने कोयनाला सहा महिन्यांचा कारावास सुनावला.
फोटो - गेट्टी इमेजेस
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -