अभिनेत्री एलियाना डीक्रूझ प्रेग्नंट?
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2018 06:03 PM (IST)
याचदरम्यान, बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती बाथटबमध्ये दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डीक्रूझ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. एलियाना आई बनणार असल्याचं वृत्त आहे. एलियाना आणि तिचा बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोन लवकरच आई-बाबा होणार असल्याचं कळतं. विमानतळावर ती आपला बेबी बंप मीडियापासून लपवताना दिसली. इतकंच नाही तर स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशनेबल आऊटफिट्ससाठी प्रसिद्ध असलेली एलियाना, सध्या अनेक कार्यक्रमांना सैल कपड्यांना पसंती देताना दिसत आहे. याचदरम्यान, बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती बाथटबमध्ये दिसत आहे. "एकाप्रकारे, काही क्षण स्वत:साठी जगताना एलियाना." या फोटोद्वारे अँड्र्यू आपल्या होणाऱ्या बाळाविषयी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. अँड्र्यू नीबोन हा व्यवसायाने फोटोग्राफर असून तो मूळचा ऑस्ट्रेलियाचा आहे. दोघे अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये एलियानाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अँड्र्यूचा 'हबी' अर्थात 'नवरा' असा उल्लेख केल्याने, तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. संबंधित बातम्या इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न? कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर