यंदाचं वर्षं हे अनेकांना नवा अनुभव देऊन गेलेलं आहे. काहींना कोरोनाने नवं जगणं दिलं. काहींना लॉकडाऊनमुळे जगणं नकोसं झालं.. तर काहींना अनेक नव्या ताणतणावांना सामोरं जावं लागलं. 2020 हे वर्ष अशा अर्थाने ऐतिहासिक म्हणावं लागेल. मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर हे नवं वर्ष नेमकं काय दाखवणार आहे? याचा अंदाज कुणालाच नव्हता. पण महिना महिना वाढत गेला आणि वर्ष नकोसं झालं. त्यात सुशांत राजपूतच्या मृत्यूने भर पडली.


सुशांतचा मृत्यू झाला खरा.. पण या मृत्यूने अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. काहींना आर्थिक फसवणुकीबद्दल.. काहींना सुशांतशी मैत्री केली म्हणून आरोपी व्हावं लागलं. सुशांतच्या याच घटनेनं अभिनेत्री दीपिका पडुकोणलाही काही काळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. नार्कोटिक्स ब्युरोनं दीपिकाला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. चौकशी झाली.. आरोप झाले.. आणि कालांतराने दीपिका चित्रिकरणात व्यग्र झाली. आता दिवाळी आल्यानंतर दीपिकाला साहजिकच दिवाळीबद्दल विचारणा झाली. त्यावेळी दीपिकाने ही दिवाळी साधेपणानेच साजरी करायची ठरवली असल्याचं कळतं.


प्रियांका चोप्रा-निक जोनसने लॉकडाऊनमध्ये तयार केला 'फॅमिली बिझनेस' प्लान


दीपिकाला यंदाच्या दिवाळीच्या नियोजनाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, यंदाची दिवाळी आम्ही साधेपणानेच साजरी करणार आहोत. कारण अद्याप आपण कोरोनाला पळवून लावलेलं नाही. म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे. आमच्याकडेही आम्ही दिवाळी घरीच साजरी करणार आहोत. आम्ही आमचं कुटुंबं अगदी साधेपणाने दिवाळी साजरी करणार आहे. यंदाचं वर्ष अनेक गोष्टींच्या अनुषंगाने वेदनादायी आहे. त्यामुळे आम्ही घरी पूजाही करू. पण जो वेळ असेल तो घरच्यांसोबतच घालवणार आहोत.


सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा संशय कंगना रनौतने व्यक्त केला होता. त्यानंतर ती ट्विटरवरून सातत्याने बोलत होती. त्यात तिने रणवीर सिंगवरही तो ड्रग घेत असल्याचा आरोप लगावला होता. दीपिकाला चौकशीसाठी ब्युरोनं बोलावलं होतं. दीपिकाच्या मॅनेजरलाही बोलवून चौकशी करण्यात आली होती. यासगळ्या पार्श्वभूमीवर दीपिकाचं दिपाळी साधेपणाने साजरी करणं याला महत्व आहे.