मुंबई : प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अभिनेते विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना शुक्रवारी दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती आहे.
विनोद खन्ना यांना डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याने रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती त्यांचे पुत्र, अभिनेते राहुल खन्ना यांनी दिली.
गुरुवारी विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा 'एक राणी ऐसी भी'चा ट्रेलर लाँचिंग सोहळा ठेवण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नाहीत.