गोंदिया : सिनेअभिनेता आणि कॉमेडियन विजय राज यांची गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन यांच्या शेरनी चित्रपटाचे सुटिगं सुरु असताना क्रू मधील एका महिलेने विनयभंगाचा आरोप विजय राज यांच्यावर केला होता. त्यानंतर काल रात्री उशिला विजर राज यांना अटक करण्यात आली होती. आज त्याना न्यायालयातून जामीन देण्यात आला आहे.


मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. यावेळी गोंदियातील हॉटेल गेटवे येथे कॉमेडियन अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केली असल्याचा आरोप तिने केला आहे. विजय राज यांच्यावर गोंदियाच्या राम नगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन विजय राज यांना रात्री उशिरा अटक केली होती.


मला माफ कर.. माझ्यामुळे तुलाही टीकेला सामोरं जावं लागलं, अंकिता लोखंडेची बॉयफ्रेण्डसाठी पोस्ट


शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल गेटवे येथे मागील पंधरा दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. शुटींगदरम्यान आणि हॉटेलमध्ये कॉमेडियन अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टापमधील युवतीची छेड काढल्याने युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354(अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली होती. तर या विषयी पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.