Sahil Khan : कधीकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात घर करणारा साहील खाने (Sahil Khan Marriage) हा अभिनेता सध्या बॉलिवुडपासून दूर आहे. बॉलिवुडपासून दूर असला तरी वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय आहे. दरम्यान, त्याने नुकतेच दुसरा विवाह केला आहे. विशेष म्हणजे तो स्वत: 48 वर्षांचा आहे. पण त्याची दुसरी पत्नी मात्र अवघ्या 22 वर्षांची आहे. 


साहीलची पत्नी 26 वर्षांनी लहान 


साहील खान हा सध्या बॉलिवुडपासून दूर आहे. मात्र शरीरसौष्ठवाची त्याला प्रचंड आवड आहे. शरीरसौष्ठवासाठी लागणारी वेगवेगळी उत्पादनांची तो निर्मिती करतो. सोशल मीडियावर या उत्पादनांची जाहीरतही तो करताना दिसतो. दरम्यान, त्याने नुकताच संसार थाटला आहे. त्याने मिलेना अलेक्झांड्रा नावाच्या तरुणीसोबत विवाह केला आहे. मिलेना ही त्याच्यापेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान आहे. साहीलने मिलेनासोबत दोन्ही धार्मिक पद्धतींनी लग्न केले आहे. 


22 वर्षांच्या तरुणीशी केलं लग्न


मिलेना अलेक्झांड्रा हिचे वय अवघे 22 वर्षे आहे. तर तो 48 वर्षांचा आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याने ख्रिश्नच धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले होते. त्यानंतर आता त्याने मु्स्लीम धर्मानुसार निकाह केला आहे. या निकाहचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने याआधी 15 फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्याचे दिसतेय. विशेष म्हणजे बुर्ज खलिफामध्ये त्यांचा विवाह पार पडला होता. या विवाहावेळी  साहील खान आणि मिलेना अलेक्झांड्रा यांचे जवळचे मित्र तसेच नातेवाईक उपस्थित होते. आता पुन्हा एकदा त्याने मुस्लीम धर्मानुसार निकाह केला आहे.  




साहील खानने केला निकाह


साहील खानने 18 फेब्रुवारी रोजी दुसरा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत साहील खान तसेच मिलेना अलेक्झांड्रा हे दोघे दिसत आहेत. साहील खान हा पठाणी वेशात दिसतोय. त्याच्या डोक्यावर सेहरा दिसतोय. विशेष म्हणजे मिलेना अलेक्झांड्रा हिच्यादेखील डोक्यावर सेहरा आहे. साहील खान मिलेनाच्या डोक्यावरील सेहरा काढताना दिसतोय. दोघेही पांढऱ्या शुभ्र कपड्यांत दिसत आहेत. साहील खानच्या फॅन्सहा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय. 






साहील खान हा धर्माने मुस्लीम आहे तर त्याची पत्नी ही धर्मा ख्रिश्चन आहे. त्यामुळेच त्याने दोन्ही धर्मांनुसार विवाह केला आहे.  


साहील खानची पहिली पत्नी कोण होती? 


 मिलेना अलेक्झांड्रा ही साहील खानची दुसरी पत्नी आहे. तिची पहिली पत्नी ही ईराणची होती. तिचे नाव नेगर खान असे आहे. नेगर खान ही अभिनेत्री आहे. 2005 साली या दोघांनीही घटस्फोट घेतला होता. तर साहील खानची दुसरी पत्नी मिलेना ही बेलारूस येथील आहे. मिलेनाने नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.  



हेही वाचा :


अक्षय खन्ना नव्हे तर 'हा' हिरो होता पहिली पसंत, औरंगजेब साकारण्यासाठी दिग्गजाला झाली होती विचारणा, पण...


Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा लेटेस्ट लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!


"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"