Rishab Shetty New Film On Shivaji Maharaj : सध्या चित्रपटगृहांत छावा या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. देशभरात याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. महाराष्ट्रात तर या चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जवळजवळ 200 कोटी रुपयांचा गल्ला जमलवा आहे. असे असतानाच आता दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. 

ऋषभ शेट्टी घेतोय मेहनत 

शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटावर काम सुरू आहे. विशेष म्हणजे शिवाजी महाराज यांच्या पात्राला न्याय मिळावा म्हणून ऋषभ शेट्टी स्वत: प्रचंड मेहनत घेत आहे. 

आगामी दोन वर्षांनी चित्रपट प्रदर्शित होणार

याआधी 3 डिसेंबर 2024 रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा करताना चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी अनोखे पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत होता. आगामी दोन वर्षांनी म्हणजेच 21 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटावर काम चालू आहे.

नव्याने रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी चित्रपट निर्माते संदीप सिंह आणि ऋषभ शेट्टी यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरे छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. तर त्यांच्यापुढे एक देवीची मूर्ती दिसत आहे. ही देवी सिंहावर आसनस्थ झालेली दिसत आहे. 

चित्रपट जगभरात केला जाणार प्रदर्शित 

हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असल्यामुळे यामध्ये नेमके काय असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :

खुशखबर! ॲपल कंपनीने लॉन्च केला नवा फोन, जाणून घ्या iPhone 16e चे भन्नाट फिचर्स, किंमत नेमकी किती?

Sahil Khan Nikah : त्याचं वय 48 वर्षे, लग्न केलं 22 वर्षांच्या तरुणीशी, अभिनेता साहील खानच्या लग्नाची देशभरात चर्चा; शेअर केला निकाहचा व्हिडीओ!

"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"