Raghu Ram Inter-Cast Marriage : 'रोडीज' फेम अभिनेता रघु राम याने अलिकडेच त्याच्या इंटरकास्ट मॅरेजबद्दल काही खुलासे केले. यासोबतच त्याने पत्नीसोबत राहण्यासाठी काही सवयी सोडल्याचं सांगितलं. अभिनेता रघु राम आणि नताली डी लुसिओ यांनी 2018 मध्ये लग्न केलं. वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या लग्नात विविध धर्मातील विधी करण्यात आले. रघु आणि नतालीच्या लग्नात त्यांनी तेलगू, ख्रिश्चन आणि काही पंजाबी प्रथा आणि परंपरेनुसार त्यांचा अनोखा लग्नसोहळा पार पडला. अलिकडे 'कपल ऑफ थिंग्स' कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मॅरेज लाईफबद्दल सांगितलं.


14 वर्षांनी लहान पत्नीसाठी अभिनेत्याने सोडलं स्मोकिंग


रघु साऊथ इंडियन आणि नताली ख्रिश्चन असल्याने त्यांचा आंतरधार्मिक विवाह पार पडला. लग्नासाठी दोघांनी वेगवेगळी लिस्ट बनवली होती. इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे त्यांना ऑफिशियल रजिस्ट्रेशनसाठी कोर्ट मॅरेजही करावी लागली.  रघुने मुलाखतीत सांगितलं की, त्याने स्मोकिंग सोडण्यामागे नताली मुख्य कारण आहे. रघुने सांगितलं की, नताली स्मोक करत नाही, त्यामुळे त्याने सिगरेट सोडली, कारण तो किस करायला गेल्यावर सिगरेटच्या वासामुळे नताली मागे हटली होती. रघुला सिगरेटचं व्यसन होतं, तो दर दिवशी एक किंवा दोन पॅकेट स्मोक करायचा. यामुळे सिगरेटचा वास यायचा, जो नतालीला पसंत नव्हता. त्यामुळेच सिगरेट सोडल्याचं रघुने सांगितलं.






पहिली डेट अन् KISS चा किस्सा


रघुने सांगितलं की, नताली आणि त्याची भेट झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. डेटिंग सुरु झाल्यावर त्याला कळलं की, नताली स्मोक करत नाही आणि तिने आतापर्यंत स्मोकिंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला डेट केलेलं नाही. रघुने सांगितलं की, नतालीला डेटवर नेण्याआधी त्याने स्मोक केलं होतं. त्यानंतर डेटवर गेल्यावर नतालीला किस केल्यावर तिला सिगरेटचा वास आला आणि तिला ते आवडलं नसल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिचा चेहरा पाहून त्याला समजलं की, जर त्याला नतालीसोबत भविष्य हवं असेल, तर त्याला स्मोकिंग सोडावं लागेल.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करणार, पाकिस्तानी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ; पाकिस्तानात पार पडणार शाही विवाहसोहळा