अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचं वितरण काल नवी दिल्लीत पार पडलं. यावेळी प्रसाद ओकने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी अकराच मानकऱ्यांना सन्मानित केलं. त्यानंतर उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर प्रसाद ओकने ट्वीटरवरुन आपला निषेध व्यक्त केला. ‘आम्ही कच्चा लिंबूच्या टीमच्या वतीनी "राष्ट्रीय पुरस्कार" स्वीकारला आहे. जे झालं त्याचा निषेध आहेच पण पुरस्काराचा आनंद जास्त मोठ्ठा आहे.’ असा ट्वीट त्याने केला.
दरम्यान, इतर कलाकारांनीही झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्मृती इराणींकडून पुरस्कार घेण्यास आमचा विरोध नाही, तर राष्ट्रीय पुरस्कार असून तो राष्ट्रपतींकडून न दिला जाण्याला आमचा विरोध आहे.’ अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
'स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार नाही'
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : श्रीदेवी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
कुणाच्याही हातून पुरस्कार स्वीकारला, तरी किंमत कमी होत नाही : नाना