मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासनं बाहुबली 2 या आगामी चित्रपटासाठी दोनवेळा शरिरात बदल केले आहेत. मिस्टर वर्ल्ड खिताब मिळवणाऱ्या लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली हे बदल घडवून आणले आहेत. बाहुबली 2 मध्ये अभिनेता प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ज्यातील शिवुडूच्या भूमिकेसाठी प्रभासनं 86 ते 88 किलो वजनासाठी कष्ट घेतले आहेत, तर दुसरीकडे बाहुबलीच्या मुख्य भूमिकेसाठी प्रभासनं 105 किलो वजनासाठी शरिरात बदल घडवून आणले आहेत.

"बाहुबलीच्या रुपातील प्रभासला शिवुडूच्या भूमिकेसाठी काटक दिसावं लागलं, तर शिवडूचा पिता अर्थातच बाहुबलीच्या भूमिकेसाठी जास्त पीळदार शरीर कमावावं लागलं आहे. या शारिरिक बदलासाठी प्रभासनं खूप कष्ट घेतले आहेत. या सर्व प्रक्रियेदरम्यान प्रभासला आपल्या बॉडी फॅटची मात्रा 100 किलोच्या जवळपास ठेवण्याची कसरत करावी लागली आहे," असं 2010 सालचे मिस्टर वर्ल्ड रेड्डी यांवी म्हटलं आहे.

आपल्या ट्रेनिंगदरम्यान प्रभासनं आहार आणि व्यायामाचं काटेकोरपणे पालन केलं. बऱ्याचदा वेळेअभावी मध्यरात्रीही व्यायामाला सुरुवात करावी लागली, मात्र कोणताही कंटाळा न दाखवता प्रभासनं आपली दिनचर्या नियमित ठेवली असंही रेड्डी पुढं म्हणाले.

कशी होती प्रभासची दिनचर्या?

अर्धा तास कार्डिओ आणि आहाराचं काटेकोर पालन

कार्बोहायड्रेटला आहारातून वगळलं

शिवडूच्या भूमिकेसाठी प्रथिनांचं जास्त सेवन

आहारात अंड्यातील पांढरा बलक, चिकन, नट्स, सुका मेवा, बदाम, मासे आणि फळभाज्यांचा समावेश

बाहुबलीच्या भूमिकेसाठी आहारात पनीर आणि मटणाचं प्रमाण वाढवलं

कार्बोहायड्रेट असलेला आहार वाढवला

संध्याकाळच्या व्यायामामध्ये डेडलीफ्ट, स्क्वेट्स, बेंच प्रेस यासोबतच अनेक खडतर व्यायामप्रकारांचा समावेश

प्रभासला बिर्यानी प्रचंड आवडते, मात्र 20 दिवसांतून एकदाच त्याला बिर्यानी दिली जात असे.

चित्रिकरणादरम्यान कोणत्याही प्रकारचं जंक फूड खाण्याची प्रभासला परवानगी नव्हती.