मुंबई : बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश बाबा झाला आहे. नीलची पत्नी रुक्मिणी सहायने मुलीला जन्म दिला. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात गुरुवारी 20 सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता बाळाचा जन्म झाला.
एप्रिल महिन्यात नीलने गुड न्यूज शेअर केली होती. आपण लवकरच दोनाचे तीन होणार असल्याचं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं.
नील आणि रुक्मिणी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. हे अरेंज मॅरेज होतं. त्यांच्या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
नील हा दिग्गज गायक मुकेश यांचा नातू, तर प्रख्यात पार्श्वगायक नितीन मुकेश यांचा पुत्र आहे. नीलची भूमिका असलेले जॉनी गद्दार, जेल, सात खून माफ, डेव्हिड यासारखे चित्रपट गाजले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी अभिनेता शाहीद कपूरलाही मुलगा झाला. शाहीद आणि पत्नी मीरा राजपूत यांनी बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं आहे.