ट्विटरवर अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी चांगला कार्यरत असतो. अनेक गोष्टी तो त्याच्या चाहत्यांच्या निदर्शनाला आणून देतो. बऱ्याचदा तो आपले काही अनुभव यातून शेअर करत असतो. अशाच एका खुजलीचा.. खुजली हा हिंदी शब्द आहे. याचा अर्थ खाज असा होतो हे आपण जाणतोच. तर अशाच एका खुजलीचा किस्सा त्याने शेअर केलाय.


नवाजला प्रख्यात दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करयाचं होतं. पण त्यांची भेट होत नव्हती. ही गोष्ट आहे 2000 सालाची. म्हणजे 20 वर्षांपूर्वीची. मग त्याने मिश्रा यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाला पकडलं. त्यावेळी मिश्रा कलकत्ता मेलचं शूट करत होते. हा दिग्दर्शक त्यांना सहाय्य करत होता. त्याने नवाजला सांगितलं, की उद्या अमुक ठिकाणी ये आणि मी हात वर केला की तू भेटायला ये. मग मी तिथे तुझी ओळख मिश्रा यांच्याशी करुन देतो.


आमीरची आपल्या शिक्षकांना श्रद्धांजली, भाषा अभ्यासक प्रा. सुहास लिमये यांचे निधन


दुसऱ्या दिवशी नवाज शुटिंगच्या ठिकाणी पोचला. तोबा गर्दी होती. शूट सुरू होतं. पण नवाजचं लक्ष त्या सहाय्यक दिग्दर्शकावर होतं. तो कधी हात वर करतो आणि आपण मिश्रा यांना भेटतो असं त्याला झालं होतं. काही वेळ गेल्यानंतर त्या सहाय्यकाने हात वर केला. नवाज जीवाच्या आकांताने सगळ्या गर्दीला भेदून त्या सहाय्यकापर्यंत पोचला. मिश्रासाहेब तिथून काहीसे दूर होते. त्या सहाय्यकाने विचारलं, काय रे.. काय झालं? नवाज म्हणाला, तुम्ही म्हणाला होता ना.. की हात वर केल्यावर ये. मी आलो. मग तो सहाय्यक म्हणाला, अरे, मुझे थोडी खुजली हो गयी इसिलिये मैने हाथ उठाया. जा. तू अपने जगह पे जा के खडा हो जा. मी बोलावतो तुला. माझा हात वर व्हायची वाट बघ.


नवाज पुन्हा त्या गर्दीत जाऊन उभा राहिला. काही तास लोटले. पण त्या सहाय्यकाने काही हात वर केला नाही. नवाज पुन्हा एकदा घरी आला. हा किस्सा त्याने ट्विटरवर अशासाठी सांगितला की आता तब्बल 20 वर्षांनी तो सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करतोय. आपली ही खुजली तब्बल 20 वर्षांनी आता मिटते आहे, असं त्याने या ट्विटमध्ये सांगितलं.


इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लोकांना कसा स्ट्रगल करावा लागतो त्याचं हे उदाहरण.


Shovik's Whatsapp Chat | रियाचा भाऊ शौविकचं ड्रग तस्करांसोबत व्हॉट्सअॅप चॅट