मुंबई : सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ, अभिनेता अरबाज खान पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. गर्लफ्रेण्ड जॉर्जिया अँड्रियानीसोबत अरबाज लगीनगाठ बांधणार असल्याचं बोललं जातं.
मॉडेल-अभिनेत्री मलायका अरोरासोबत 18 वर्षांच्या संसारानंतर अरबाज खान 2017 मध्ये विभक्त झाला होता. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज यांच्यातील मैत्री कायम आहे. खान कुटुंबांतील सोहळ्यांना ती अनेकदा उपस्थिती लावते.
अरबाजला जॉर्जियासोबत लग्न करण्याची इच्छा आहे, मात्र खान कुटुंबाची तिला पसंती नसल्याचं म्हटलं जातं. अरबाजला इतक्या वर्षांत स्वतःची ओळख निर्माण करता न आल्यामुळे मलायका नाराज होती, असं खान कुटुंबीयांना वाटत असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी अरबाज रोमानियन वंशाच्या अॅलेक्झांड्रा कॅमेलियाला डेट करत असल्याचं समोर आलं होतं. अरबाजच इन्स्टाग्रामवर तिच्यासोबत फोटो शेअर करत असे.
अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली काही महिन्यांपूर्वी दिली होती. अरबाजच्या याच सवयीमुळे अरबाज-मलायकामध्ये वितुष्ट आल्याची चर्चा रंगली होती.
काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय कपूरच्या घरी झालेल्या पार्टीला अरबाज-जॉर्जिया एकत्र आले होते. यावेळी मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोराही हजर होती. तिघांचे आनंदी फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
संबंधित बातम्या
आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली
मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज कोणाला डेट करतोय?
18 वर्षांचा संसार मोडला, अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट
“मलायकावर खूप प्रेम करतो, तिला गमावण्याची भीती वाटते”