अबू सालेमची ‘संजू’च्या निर्मात्यांना नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2018 08:43 PM (IST)
तुरुंगात असलेल्या अबू सालेमने वकिलांच्या मार्फत ‘संजू’च्या दोन्ही निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी तुरुंगात असलेल्या गँगस्टर अबू सालेम याने मानहानीचा आरोप करत ‘संजू’ या चित्रपटाचे निर्माते राजू हिराणी आणि विधू विनोद चोप्रा यांना नोटीस पाठवली आहे. संजू चित्रपटात चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आक्षेप अबू सालेमने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या अबू सालेमने वकिलांच्या मार्फत ‘संजू’च्या दोन्ही निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. कारण 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाआधी अबू सालेमनं संजय दत्तला कोणत्याही प्रकारची शस्त्र पुरवली नाहीत, असा दावा सालेमच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, अबू सालेम सध्या 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अबू सालेम आणि मुंबई बॉम्बस्फोट अबू सालेमला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या कटाची संपूर्ण माहिती होती. सालेम या कटात सहभागीही होता आणि कटाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तो प्रयत्नशील होता.