Abdu Rozik Summoned By ED :  मूळचा ताजकिस्तानचा असलेला गायक 'बिग बॉस'फेम अब्दु रोजिक (Abdu Rozik) याची आज मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी होणार आहे. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज अब्दु ईडीसमोर  चौकशीसाठी हजर राहणार आहे. 


अब्दुला आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, अब्दुला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. 


अब्दु रोजिक एक व्यावसायिक देखील आहे. अब्दुचे अनेक देशांमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अब्दूने मुंबईत 'बर्गीर' नावाचे एक आलिशान रेस्टॉरंटही उघडले. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणखी काही कंपनीचे पैसे गुंतवले गेले आहेत. ही कंपनी ड्रग्जचा व्यवहार करते, असे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने अब्दुला समन्स पाठवले असून त्याची चौकशी सुरू आहे.


'बिग बॉस 16' मधून भारतात मिळाले स्टारडम


अब्दु रोजिक हा एक उत्तम मनोरंजन करणारा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पण भारतात त्याला सलमान खानच्या 'बिग बॉस शो'मधून मोठी ओळख मिळाली. शोमधील अब्दुची खोडकर शैली आणि त्याचा सच्चापणा पाहून सलमान खानही त्याचा चाहता झाला. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 



अब्दु रोजिकची उंची जरी लहान असली तरी त्याच्यामध्ये टॅलेंट मोठे आहे. तो तजाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक आहे. अब्दु हा एक रॅपर देखील आहे. एका रॅप साँगमुळे अब्दुला लोकप्रियता मिळाली. गायक आणि रॅपर असण्यासोबतच अब्दु हा  बॉक्सर, म्यूजिशियन आणि ब्लॉगर देखील आहे. सोशल मीडियावर अनेक जण अब्दुला फॉलो करतात.   






अब्दु रोजिकचे आहे युट्यूब चॅनल 


अब्दु रोजिकचे Avlod Media नावाचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर अब्दु  त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करतो. या चॅनलला पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी सब्सक्राइब केलं आहे. अब्दु हा इंस्टाग्रामवर देखील अॅक्टिव्ह असतो. इंस्टाग्रामवर त्याला  2.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. सलमान खान, ए.आर. रहमान या सेलिब्रिटींसोबतचा अब्दुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ए.आर. रहमान यांच्या मुलीच्या म्हणजेच खतिजा रहमानच्या रिसेप्शनला देखील अब्दुनं हजेरी लावली होती. 


इतर संबंधित बातमी :