Aathva Rang Premacha : चिरंतन राहणाऱ्या प्रेमावर भाष्य करणारा 'आठवा रंग प्रेमाचा' (Aathva Rang Premacha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अत्यंत फ्रेश आणि रोमॅन्टिक कथा असलेल्या असलेल्या या चित्रपटाच्या लक्षवेधी टीजरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. येत्या 17 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समीर कर्णिक यांनी 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर खुशबू सिन्हा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. खुशबू सिन्हा यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.
समीर कर्णिक यांनी केली आहे उत्तमोत्तम सिनेमाची निर्मिती
समीर कर्णिक यांनी उत्तमोत्तम सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यांनी 'क्युं हो गया ना' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करत आहे.
'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. टीजरमधून पहिले सात रंग कोणते ते स्पष्ट केलं आहे. आठवा रंग कोणता? याचं उत्तर चित्रपटात मिळेल. रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदची चित्रपटसृष्टीतली दमदार एंट्री या टीजरमधून दिसत आहे.
रिंकूने शेअर केला टीझर
रिंकूने आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिले आहे,"सगळ्यांचे रंग बदलतात. जेव्हा माणसं प्रेमात पडतात. आठवा रंग प्रेमाचा 17 जून पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूनं आर्ची ही भूमिका साकारली. चित्रपटामधील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना तर 100, अनपॉज्ड,200 हल्ला हो या हिंदी वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकू तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
संबंधित बातम्या