नाना हिरो, सतीश राजवाडे दिग्दर्शक, अजय देवगनचा पहिला मराठी सिनेमा
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2018 04:05 PM (IST)
'हा सैतान बाटलीत मावनार नाय' अशी टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे. येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट 'आपला मानूस'चा फर्स्ट लूक रीलिज करण्यात आला आहे. नटसम्राट अभिनेता नाना पाटेकर यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. अजयने ट्विटरवर आपला माणूसचा पहिला लूक शेअर केला. पोस्टरमध्ये एका पावसाळी रात्री नाना पाटेकर बाईक चालवताना दिसत आहे. 'हा सैतान बाटलीत मावनार नाय' अशी टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे. येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'आपला मानूस'च्या दिग्दर्शनाची धुरा हरहुन्नरी दिग्दर्शक सतीश राजवाडे याने घेतली आहे. नानासोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत. आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही कथा आहे. शहरी जीवन आणि नात्यांची गुंतागुंत यामध्ये अडकलेल्या पित्याची ही कहाणी आहे. एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांना आयुष्य आणि कुटुंबाविषयीच्या धारणांवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते.