आपल्याला गोविंदा आणि चंकी पांडे यांचा 1993 साली आलेला चित्रपट आंखें (Aankhen) चित्रपट नक्कीच आठवत असेल. हा चित्रपट विनोदी असण्यासोबत एका गाण्यासाठी खूप प्रसिद्ध झाला. होय, 'ओ लाल दुप्पटे वाली तेरा नाम तो बता' हे गाणं आजही एव्हरग्रीन मानलं जातं. हे गाणं अभिनेत्री रितु शिवपुरी, रागेश्वरी लुंबा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. आज आपण या गाण्यानंतर खूप लोकप्रिय झालेल्या रितुबद्दल बोलूयात. या चित्रपटात रितु गोविंदाच्या अपोझिट दिसली होती आणि दोघांच्या केमिस्ट्रीचेही खूप कौतुक झाले.
या चित्रपटात दिसल्यानंतर रितूची चित्रपट कारकीर्द शिखरावर जाईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. रितू आँखें नंतर 'आर या पार, रॉक डान्सर, ग्लॅमर गर्ल, हड कर दी आपने यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली. पण यश न मिळाल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर गेली. मीडिया रिपोर्टनुसार यानंतर रितूने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअर केले आणि नाव कमवायला सुरुवात केली. रितू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. जिथे ती आपले डिझाइन केलेले ज्वेलरी शो केस करत राहते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आंखेंच्या रिलीजला 28 वर्षे उलटून गेली आहेत. पण असे असूनही रितूचा लूक आधीसारखाच सुंदर आहे.
अलीकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती ग्लॅमरस पोझेस देताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना 90 चा काळ आठवला आणि सर्वांनी तिच्या जबरदस्त लुकचे कौतुक केले. रितू एक फिटनेस फ्रीक असून ती पोहणे आणि योगाने स्वत: ला फिट ठेवते. जिमिंग करत असताना 49 वर्षीय रितूने सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. रितू अभिनेत्री ओम शिवपुरी आणि 'सास भी कभी बहु थी'मध्ये बाची भूमिका साकारली अभिनेत्री सुधा शिवपुरी यांची मुलगी आहे. चित्रपटातून दूर गेली असली तरीही रितूचे सोशल मीडियावर मोठे फॅनफोलोविंग आहे. ती नेहमी चाहत्यांनी संवाद साधत असते.