Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आमिर आज आलिशान आयुष्य जगत असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 


आमिरने नुकतचं एका मुलाखतीत त्याला आयुष्यात कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य केलं आहे. आमिरचे वडील ताहीर हुसैन हे सिने-निर्माते होते. त्यामुळे आमिर लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आला असल्याचा अनेकांचा समज आहे. 


नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आमिर म्हणाला,"माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी आम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता. एका सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतरही त्यांना त्या सिनेमाची निर्मिती करता आली नाही. तसेच ते कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली". 


आमिर पुढे म्हणाला,"जुन्या आठवणींना उजाळा देताना खूप त्रास होतो. माझे वडील खूप प्रामाणिक असल्याने त्यावेळी वडिलांना पाहून खूप दु:ख व्हायचं. खरतर त्यांनी कर्ज घेण्याची गरज नव्हती. त्याकाळी सिनेमांच्या तिकीटांची ब्लॅकने विक्री होत असे. त्यामुळे निर्मात्यांनादेखील जास्त पैसे मिळत नसे. वडिलांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी त्यांना जास्त पैसे मिळालेले नाहीत. वडिलांची होणारी दगदग पाहून प्रचंड त्रास व्हायचा".


सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी खूप लोकांकडून पैसै घेतले होते. त्यामुळे ती मंडळी सतत फोन करून वडिलांना त्रास देत असायची. ते वडिलांसोबत भांडत असताना मी काहीच करू शकलो नाही. कारण त्यावेळी माझ्याकडेदेखील पैसे नव्हते. पण वडिलांना मात्र निराश न होता मेहनत घेतली आणि त्या सर्व लोकांना त्यांचे पैसे परत दिले. 


आमिर खानने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. नुकताच त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाची निर्मात्यांकडून खूप अपेक्षा होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. आमिरचा आता पुढचा प्रोजेक्ट नक्की काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. 


संबंधित बातम्या


Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर; व्हिडीओला कमेंट करत नेटकरी म्हणाले, 'हा तर म्हातारा...'